21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात २८० कोटींचे घबाड पकडले

राज्यात २८० कोटींचे घबाड पकडले

आतापर्यंत अनेक ठिकाणी सापडली रोकड

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची चुरस रंगात आली आहे. निवडणूक आयोगाच्या उड्डाण पथकाने आणि पोलिसांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणांहून ७.३ कोटी रुपये आणि प्रेशर कुकर असलेले वाहन जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, प्रेशर कुकर असलेल्या वाहनाबाबत दुस-या पक्षाकडून प्रचार सुरू असताना माहिती मिळाली होती. ते म्हणाले की, ऐरोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले आणि प्रेशर कुकर ‘निवडणूक चिन्हावर’ निवडणूक लढवत असलेले विजय चौघुले यांचे पोस्टर वाहनाच्या पुढच्या सीटवर आढळून आले आहे.

विविध ठिकाणांहून जी रोख जमा करण्यात आली त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे १२ जणांकडून २.३ कोटी रुपये रोख जप्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जाण्याचे कारणही ते सांगू शकले नाहीत.

दुस-या जप्तीमध्ये मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी बुधवारी नाकाबंदीदरम्यान एका एटीएम व्हॅनची झडती घेतली. त्यात साडेतीन कोटी रुपये सापडले, जे जप्त करण्यात आले, व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या दोघांनी सुमारे ४० लाख रुपयांची माहिती दिली. पण, उर्वरित रकमेबाबत स्पष्ट माहिती देऊ शकले नाहीत. ही रोकड खासगी बँकेची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कागदपत्र नसल्यामुळे ही रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आणखी एका ठिकाणी मुंबई-अहमदाबाद हायवेवर नाकाबंदी दरम्यान, एका गाडीतील १.५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जवळपास २८० कोटी रुपये जप्त करण्यात आले. जे गेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपेक्षा खूप जास्त आहेत. एकट्या राज्यात ७३.११ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ३७.९८ कोटी रुपयांची दारू, ३७.७६ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि ९०.५३ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, ज्या मतदारसंघांमध्ये प्रलोभन दाखविण्याची अधिक शक्यता आहे, राज्यभरातील असे ९१ मतदारसंघ खर्च संवेदनशील मतदारसंघ म्हणून चिन्हांकित केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR