22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरातमध्ये अग्नितांडव, २९ ठार

गुजरातमध्ये अग्नितांडव, २९ ठार

१० जणांना वाचविण्यात यश राजकोटच्या गेम झोनमधील घटना छत्तीसगडमध्ये कारखाना स्फोटात १२ ठार

राजकोट/बेमतरा : छत्तीसगड आणि गुजरातमध्ये शनिवार दि. २५ मे रोजी स्फोटाच्या दोन मोठ्या दुर्दैवी घटना घडल्या असूून छत्तीसगडच्या बेमतरा येथे स्फोटकाच्या कारखान्यात ब्लास्ट होऊन १२ ठार झाले तर गुजरातच्या राजकोट शहरातील गेम झोनमध्ये आग लागल्याने २९ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटना मिळून आतापर्यत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या अपघातात एका लहान मुलासह २४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मृतांचे मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटू शकली नाही. आग लागली त्यावेळी गेम झोनमध्ये किती लोक उपस्थित होते, हे अद्याप प्रशासनाला सांगता आलेले नाही. अनेक अग्निशमन दल आणि बचाव पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण गेम झोन जळून राख झाला आहे. आतापर्यंत १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त आनंद पटेल म्हणाले, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या ८ पथक आग विझवण्यात आणि बचावकार्यात गुंतले आहेत. पोलिस आयुक्त राजू भार्गव, जिल्हाधिकारी आनंद पटेल हेही घटनास्थळी हजर आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोनच दिवसांपूर्वी डोंबिवली येथे एका केमिकलच्या कंपनीत स्फोट झाला होता. यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले आहेत. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता ही छत्तीसगडमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटावेळी अनेकजण परिसरात उपस्थित होते असे सांगितले जात आहे.

राजकोटचे सर्व गेम झोन बंद
राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव म्हणाले- टीआरपी मॉलमध्ये आग लागली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या राजकोटचे सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गेंिमग झोनचे ऑडिट केले जाईल. रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत चर्चा झाली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई केली जाईल.

छत्तीसगडमध्ये स्फोटात १२ ठार
छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील एका स्फोटकाच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बेरलामधील पिरडा गावात हा स्फोट झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्याच्या माहितीनुसार, सहाजण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR