मुंबई : मुंबईत ३ दिवस ड्राय डे पाळला जाणार आहे. २० मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पुढील पाचव्या टप्प्यामुळे मुंबईमध्ये १८ ते २० मे दरम्यान ड्राय डे पाळला जाणार आहे. मुंबईतील बार आणि वाईन शॉप १८ मे रोजी संध्याकाळी ५:०० ते २० मे रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद राहतील.
मुंबई, पालघर, कल्याण आणि ठाणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मतदारसंघ आहेत जे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे आणि नजीकच्या मतदारसंघांनी हे ड्राय डे दिवस पाळले पाहिजेत. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व वाईन शॉप्स आणि बार बंद राहतील. निकाल जाहीर होणा-या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी मुंबईत पुन्हा एकदा ड्राय डे पाळला जाणार आहे.