22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयभीषण रस्ता अपघातात ३ ठार; १३ जखमी

भीषण रस्ता अपघातात ३ ठार; १३ जखमी

भुवनेश्वर : ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील बोरिगुम्मा भागात एसयूव्हीची दोन दुचाकी, ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेत तीन जण ठार तर १३ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ठार झालेल्या तिघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पटनायक यांनी शोकसंतप्त कुटुंबियांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आणि जखमींवर योग्य वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १३ जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कोरापुट येथील शहीद लक्ष्मण नायक वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इतरांना बोरीगामाच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दोन दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक ट्रॅक्टर आणि एक एसयूव्ही यांची एकमेकांना धडक बसली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक एसयूव्ही आणि एक ऑटोरिक्षा एकाच दिशेने येत असून समोरून एक ट्रॅक्टर जात आहे. एसयूव्हीचा वेग खूप होता आणि ती ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी समोरून येणारा एक दुचाकीस्वारही भरधाव वेगात ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची एसयूव्हीला धडक बसली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR