चंदिगड : चंदिगडच्या महापौर निवडणुकीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीपूर्वी भाजपानंआपलं पारडं जड करण्यास सुरुवात केली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी आम आदमी पक्षाचे ३ नगरसेवक हे भाजपात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंडीगडमधील महापौर निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप होत असताना ही बातमी चंडीगडमध्ये ऐक्याचे प्रदर्शन करणा-या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार आपचे तीन नगरसेवक हे भाजपाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ते कुठल्याही क्षणी भाजपात दाखल झाल्याची घोषणा होऊ शकते. आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपात दाखल झाल्यास चंडीगड महानगरपालिकेतील सर्व समिकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने महापौरपदाची निवडणूक पुन्हा घेण्यास सांगितल्यास भाजपाकडे पूर्ण बहुमतासह महापौर निवडून आणण्याइतके संख्याबळ असेल.
चंदिगडमध्ये ३० जानेवारी रोजी महापौरपदाची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढवली होती. या निवडणूक १६ नगरसेवकांचा पांिठबा असतानाही भाजपानं विजय मिळवला होता. निवडणूक अधिका-यांनी काँग्रेस आणि आपच्या ८ नगरसेवकांची मतं बाद ठरवली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाने निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांनी निवडणूक अधिका-यांचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. तसेच अधिकारी कशाप्रकारे मत रद्द करत आहेत, हे या व्हीडीओत दिसत आहे, असा दावा केला होता.