21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयपावसामुळे ३ जणांचा मृत्यू; तुतीकोरीनमध्ये ५०० प्रवासी अडकले

पावसामुळे ३ जणांचा मृत्यू; तुतीकोरीनमध्ये ५०० प्रवासी अडकले

चेन्नई : तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दल, लष्कर आणि इतर बचाव पथक मदतकार्य करत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) तामिळनाडूत पुढील सहा दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीनहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तुतीकोरीन जिल्ह्यातील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर सुमारे ५०० प्रवासी अडकले आहेत.

मुसळधार पावसामुळे स्टेशनच्या चारी बाजूने पाण्याने वेढा दिला आहे. रेल्वे रुळांचे नुकसान झाले आहे. अडकलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय हवाई दलाने मदत सामग्रीचे हवाई ड्रॉप सुरू केले आहेत. अस्वस्थ प्रवाशांना भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात येत आहे. भारतीय वायुसेनेच्या सदर्न एअर कमांडने मदतकार्यात त्यांची हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. आपत्ती निवारण ऑपरेशन्ससाठी सुलूर हवाई दलाचे स्टेशन कार्यरत आहे. चार जिल्ह्यांतील ७ हजारून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस आणि पुराच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी १९ डिसेंबरला वेळ मागितला आहे. कन्याकुमारी, थुथुकुडी, तेनकासी आणि तिरुनेलवेली हे चार दक्षिणेकडील जिल्हे अतिवृष्टीने प्रभावित झाले आहेत. तुतीकोरीनमधील कायलपट्टीनममध्ये २४ तासांत ९५ सेमी पाऊस झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR