26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रमहागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खुशखबर जुलै २०२४ पासून थकबाकी मिळणार १७ लाख कर्मचा-यांना लाभ

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय कर्मचा-यांच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचा-यांना देण्यात येणा-या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करून तो ५३ टक्के करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने आज राज्य शासकीय कर्मचा-यांना मोठी खुशखबर दिली. महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०२४ पासून वाढ होणार असून फेब्रुवारी महिन्याच्या पगारासोबत सात महिन्यांच्या थकबाकी मिळणार असल्याने सरकारी कर्मचारी एक तारखेला मालामाल होणार आहेत.

महागाई भत्ता व अन्य मागण्यांसाठी ६ मार्चला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर १ जुलै २०२४ पासून केंद्र सरकारी कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार १ जुलै पासून वाढीव भत्ता मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतना सोबत जुलै पासूनची थकबाकीही दिली जाणार आहे. या निर्णयाचा राज्यातील एकूण १७ लाख शासकीय कर्मचा-यांना फायदा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR