श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा या ठिकाणी आज लष्कराच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा या ठिकाणी सैनिकांना घेऊन जात असलेला लष्कराचा ट्रक रस्त्यावरून अचानक घसरला आणि दरीत कोसळला.
या अपघातात ३ जवानांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ खोल दरीत हा ट्रक कोसळला. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील एसके पायनजवळ वळण घेण्याच्या प्रयत्नात असताना लष्कराच्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी सुरक्षा दल आणि पोलिस दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.