27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांच्या बंगल्यावर ३० कोटींचा खर्च; पुन्हा उधळपट्टी

मंत्र्यांच्या बंगल्यावर ३० कोटींचा खर्च; पुन्हा उधळपट्टी

मुंबई : राज्य सरकारकडून मंत्र्यांच्या बंगल्यावरती पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्े आहे. या सर्व बंगल्यांचे पाचच महिन्यांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खरे तर मंत्री वास्तव्याला आल्यानंतर हा खर्च करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा ३० कोटी रुपयांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यापैकी जवळपास ६० टक्के काम न करता, परस्पर पैसे काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कुठल्या बंगल्यावर किती खर्च
सुधीर मुनगंटीवार- ‘पर्णकुटी’, १ कोटी ५० लाख
गुलाबराव पाटील- ‘जेतवन’ १ कोटी १५ लाख
राधाकृष्ण विखे पाटील- ‘रॉयल स्टोन’ १ कोटी ५८ लाख
अतुल सावे- ‘शिवगड’ १ कोटी ४ लाख
अजित पवार- ‘देवगिरी’ १९ लाख ८९ हजार
दीपक केसरकर- ‘रामटेक’ ७५ लाख ४२ हजार
तानाजी सावंत- ‘लोहगड’ ८७ लाख ४६ हजार
बाळासाहेब भवन- ‘ब्रह्मगिरी’ १ कोटी ५७ लाख
चंद्रकांत पाटील- ‘सिंहगड’ ५२ लाख ३७ हजार
राहुल नार्वेकर- ‘शिवगिरी’ ४२ लाख
विजयकुमार गावित- ‘चित्रकूट’ १ कोटी ५४ लाख
उदय समंत- ‘मुक्तागिरी’ १ कोटी १६ लाख
संदिपान भुमरे- ‘रत्नसिंधू’ ३७ लाख २६ हजार
दिलीप वळसे पाटील- ‘सुवर्णगड’ ७३ लाख
अब्दुल सत्तार- ‘पन्हाळगड’ ५० लाख
अदिती तटकरे- ‘प्रतापगड’३५ लाख १९ हजार

वार्षिक देखभालीसाठी- १ कोटी २६ लाख रुपये
मंत्र्यांच्या बंगल्यांवरती लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानंतरही मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यांचे रंगकाम करण्यासाठी १ कोटी ५ लाखांच्या स्वतंत्र निविदा करण्यात आल्या आहेत. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ‘रायगड’ बंगल्याच्या दुरुस्तीसाठी ७५ लाखांच्या निविदा काढल्या तर आहेतच, मात्र स्टेशनरीसाठीसुद्धा ५७ लाखांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR