23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार

लोकसभा निवडणुकीसाठी ३,५०० वाहने तयार

प्रशासनाची जोरदार तयारी सुरू

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. असे असले, तरी आतापासूनच या निवडणुकीची जोरदार तयारी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यासाठी ५७ हजार मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. त्यांच्यासाठी जवळपास साडेतीन हजार वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

निवडणुकीसाठी मुंबई उपनगरात जवळपास दोन हजार वाहने, तर मुंबई शहर जिल्ह्यात दीड हजार वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
१) निवडणुकीच्या शासकीय कामकाजासाठी मोठ्या संख्येने वाहनांची आवश्यकता असते.
२) निश्चित केलेली वाहने सज्ज ठेवण्याचे आदेश निवडणूक अधिका-यांनी संबंधितांना दिले आहेत.
३) निवडणूक कामकाजासाठी ब-याच वाहनांची आवश्यक लागणार आहे. जशी जशी आवश्यकता लागेल, तशी वाहने निश्चित करण्यात येत आहेत.

इतर वाहने : २२८०
कोणती वाहने किती?
मिनी बस ४०
बस १२०
टेम्पो ५००
चारचाकी ६००

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR