28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeधाराशिवजादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ३६ लाखाची फसवणूक

जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ३६ लाखाची फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
ठेवीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून तुळजापूर तालुक्यातील अनेक नागरिकांची ३५ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ठेवीदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दि. ५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुवर्णा शंभुलिंग बोंगरगे रा. अणदुर ता. तुळजापूर, शिवानंद मारुती रिंगणे रा. फुलवाडी ता. तुळजापूर, मनोज सुखदेव कदम, प्रविण शंकर मल्लाडे, धनश्री मनोज कदम, रा. इनाम धामणी ता. मिरज जि. सांगली यांनी ठेवीदारांना ठेवीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यांनी सन २०१२ ते २०१८ या कालावधीत नळदुर्ग येथे फिर्यादी शाहदाबी इक्करार अली सय्यद रा. इंदीरानगर, नळदुर्ग यांना आरोपींनी संगणमत करुन भूम प्रॉपकॉस लिमीटेड ही कंपनी स्थापन करुन शाहदाबी सय्यद व त्यांच्या साथीदारांना सहा वर्षानंतर तुमच्या ठेवीवर १३ टक्के व्याजाने परतावा भेटेल असे सांगुन विश्वास संपादन केला.

त्यांच्याकडून ३५ लाख ९० हजार रूपये ठेवीच्या स्वरुपात घेतले. शाहदाबी सय्यद व त्यांचे साथीदारांनी आरोपींताना गुंतवलेल्या पैशाची व परतावा याची मागणी केली असता आरोपींनी थोड्या दिवसात १३ टक्क्याने परत करु असे सांगीतले. परंतु आजपर्यंत ठेवीदारांनी गुंतवलेले पैसे व परतावा परत मिळाला नाही. शाहदाबी सय्यद व साथीदारांची फसवणुक केली. या प्रकरणी शाहदाबी सय्यद यांनी दि.५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम ४२०, ४०६ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR