27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रसीईटीत ३७ विद्यार्थ्यांना १०० परसेंटाईल गुण

सीईटीत ३७ विद्यार्थ्यांना १०० परसेंटाईल गुण

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत ३७ विद्यार्थ्यांना १०० परसेंटाईल गुण मिळाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, सीईटी सेलची वेबसाईट डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नव्हता.

महाराष्ट्रातून एमएचटी सीईटी देणा-या विद्यार्थ्यांपैकी एकूण ३७ विद्यार्थ्यांना १०० परसेंटाइल गुण मिळाले आहेत. पीसीबी ग्रुपमधील १७ विद्यार्थ्यांना तर पीसीएम ग्रुपमधील २० विद्यार्थ्यांना १०० परसेंटाइल गुण मिळाल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल एमएचटी सीईटी परीक्षा २०२४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली, ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचा निकाल पाहता येते.

आज जाहीर झालेल्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले. यामध्ये पीसीबीतील १७ आणि पीसीएममधील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील ७,२५,०५२ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुप आणि पीसीएम या ग्रुपसाठी परीक्षा दिली होती. परीक्षा देणा-या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६,७५,३७७ विद्यार्थी हे प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. सीईटी परीक्षेचा निकाल ९३.१५ टक्के इतका लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR