18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्र३९ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!

३९ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!

नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ३९ मंत्री असतील, हे आता निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर दोन आठवडे होत आले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं महायुतीत खातेवाटपावरून नाराजी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, अखेरीस नागपूरमध्ये होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपकडे मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) हे उपमुख्यमंत्री आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण ३९ मंत्री असतील.

भाजप – १९
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – ११
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ९
यातील पक्षनिहाय मंत्रिपदं कुणाला मिळाली, हे आपण पाहूया.

भाजपचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री
कॅबिनेट मंत्री :
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
अतुल सावे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
शिवेंद्रराजे भोसले
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
आशिष शेलार
अशोक उईके
जयकुमार गोरे
संजय सावकारे
नितेश राणे

राज्यमंत्री
माधुरी मिसाळ
मेघना बोर्डीकर
पंकज भोईर

शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्रिमंडळातील नवे मंत्री
कॅबिनेट मंत्री :
शंभुराज देसाई
उदय सामंत
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री :
आशिष जयस्वाल
योगेश कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्रिमंडळातील नवे मंत्री
कॅबिनेट मंत्री :

हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे
नरहरी झिरवळ
माणिकराव कोकाटे
मकरंद जाधव-पाटील

राज्यमंत्री :
इंद्रनील नाईक

महायुतीला स्पष्ट बहुम

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला प्रचंड बहुमत (२३७ जागा) मिळालं. भाजपला १३२, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. तसंच, काही अपक्षांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. दोन आठवडे व्हायला आले आणि हिवाळी अधिवेशन जवळ आलं, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नव्हता. मात्र, अखेरीस १५ डिसेंबरची तारीख जाहीर झाली आणि मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR