24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएनएमएमएस योजनेपासून ३९८ विद्यार्थी राहणार वंचित

एनएमएमएस योजनेपासून ३९८ विद्यार्थी राहणार वंचित

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत यंदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. परंतु, जिल्ह्यात नव्याने उत्तीर्ण झालेल्या १३७, तर पुर्ननोंदणीच्या ३९८ मुलांचेच अर्ज भरणे बाकी असल्याने पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मुख्याध्यापकांच्या वेतनातून वसूल करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी कळवले आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३१४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

मात्र, त्यातील केवळ १३७ मुलांचीच अर्ज पोर्टलवर भरण्यात आले आहेत. तसेच पुर्ननोंदणीमध्ये देखील ८४० पैकी ३९८ अर्ज भरण्याचे अद्याप बाकी आहे. अनेक शाळा या विद्यार्थ्यांचे एनपीएस पोर्टलवर अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.

अर्ज भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत शेवटची मुदत असताना शाळांकडून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास योजनेची चार वर्षांची रक्कम म्हणजे ४८ हजार रुपये जबाबदार प्रत्येक मुख्याध्यापकांच्या पगारातून वसूल करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर (योजना) यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

प्रतिविद्यार्थी दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती
एनएमएमएस परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष १२ हजार रुपये या प्रमाणे चार वर्ष म्हणजे बारावीपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी एनपीएस पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी लागते. शाळेच्या लॉगइनवरूनच ही सुविधा असते. नोंदणीत चुकारपणा केल्यास विद्यार्थ्याला मिळणारी चार वर्षांची शिष्यवृत्ती म्हणजे ४८ हजार रुपये मुख्याध्यापकांच्या पगारातून वसूल करून विद्यार्थ्यास देण्यात यावी, अशी देखील शासन निर्णयात तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR