18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयअहमदाबादेत इसिसच्या ४ दहशतवाद्यांना अटक

अहमदाबादेत इसिसच्या ४ दहशतवाद्यांना अटक

अहमदाबाद : अहमदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी २०२३ मध्ये एटीएसने राजकोटमधून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ते तिन्ही दहशतवादी बांगलादेशी हँडलकरसाठी काम करत होते. दहशतवादी संघटनेसाठी लोकांची भरती करण्यात त्यांचा सहभाग होता. ते तिन्ही आरोपी तरुणांना कट्टरतावादी करत तयार करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले. पाकिस्तानी हँडलरच्या आदेशानंतर त्यांनी काहीतरी कट आखला होता. त्यामुळे हे दहशतवादी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या उद्देशाने पोहोचले होते, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

गुजरात पोलिसांच्या मदतीने एटीएसने चार आरोपींना बेड्या ठोकल्या. गुजरात पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने श्रीलंकेतून दहशतवादी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांना टार्गेट लोकेशनवर पोहचण्याआधीच ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले चारही पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते. त्यांनी मोठा कट आखला होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील आदेशाची वाट पाहत होते, असेही समोर आले आहे. या दहशतवाद्यांना शस्त्रेही स्वतंत्रपणे पोहोचवली जाणार होती. एटीएसने या दहशतवाद्यांच्या फोनमधून एन्क्रिप्टेड चॅट जप्त केले आहेत. एटीएसकडून चारही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चॅट्समधून बरीच माहिती उघड झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR