भोपाळ : सिधी येथील महाकुंभमेळ्याला जाणारी बोलेरो अनियंत्रित झाली आणि खड्ड्यात कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. ४ जण जखमी झाले आहेत. सर्वांना संजय गांधी रुग्णालयात रेवा येथे पाठवण्यात आले आहे.
रविवार-सोमवार रात्री उशिरा २ वाजता मुडा पर्वतावर हा अपघात झाला. सर्व लोक सिंगरौलीच्या जयंत येथून प्रयागराज महाकुंभाला जात होते. जैतपूर गावातून दोन वाहनांमधून १३ जण प्रयागराजला रवाना झाले. यापैकी एका गाडीत आठ आणि दुस-या गाडीत पाच जण होते. सकाळी ५ वाजताच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांना अपघाताची माहिती मिळाली. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
अमिलिया पोलिस स्टेशनचे प्रभारी राजेश पांडे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. जखमींना प्रथम सिधी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथून सकाळी ८ वाजता त्यांना रेवा येथे रेफर करण्यात आले. तथापि, पोलिसांनी तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.