25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमनोरंजनसुशांतच्या मृत्यूला ४ वर्षे पूर्ण

सुशांतच्या मृत्यूला ४ वर्षे पूर्ण

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील अभिनेत्याचे निधन एक रहस्यच आहे. सुशांत याच्या मृत्यूनंतर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. दरम्यान, अभिनेत्याच्या बहिणीने देखील काही व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. व्हीडीओ मन हेलावणारे आहेत. कारण त्यातील एका व्हीडीओमध्ये सुशांत त्याच्या बहिणींसोबत आनंदी दिसत आहे. भावाच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेता सिंह हिने भावूक पोस्ट देखील लिहिली आहे.

भावासोबतच्या आठवणी ताज्या करत श्वेता सिंह म्हणाली, ‘भाई, ४ वर्ष झालीत तू आम्हाला सोडून गेला आहेस आणि आम्हाला आजही नाही माहिती की १४ जून २०२० रोजी नक्की काय झालं होतं. तुझा मृत्यू अद्यापही रहस्य आहे. मला असहाय्य वाटत आहे आणि मी अनेक वेळा अधिका-यांना सत्यासाठी आवाहन केलं आहे. मी माझा संयम गमावत आहे आणि मला हार मानावीशी वाटते.’

पुढे अभिनेत्याची बहीण म्हणाली, ‘पण आज, शेवटच्या वेळी, मला या प्रकरणात मदत करू शकणा-या प्रत्येक व्यक्तीला विचारायचे आहे, तुमच्या मनावर हात ठेवा आणि स्वत:ला विचारा, आमचा भाऊ सुशांतचे नक्की काय झालं हे जाणून घेण्याची आमची लायकी नाही का? हा राजकीय अजेंडा का बनला आहे? त्या दिवशी जे सापडले आणि जे घडले ते सांगण्याइतके सोपे का असू शकत नाही? सध्या सर्वत्र श्वेता सिंह हिच्या पोस्टची चर्चा चालू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR