24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरऔराद शहाजानीत ४२ अंश सेल्सिअस तापमान

औराद शहाजानीत ४२ अंश सेल्सिअस तापमान

उच्चांकी तापमान, औरादसह परिसरात नागरिक उकाड्याने हैराण

निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात थंडीच्या काळात उच्चांकी गारठ्याची नोंद होते आणि उन्हाळ््यात उन्हाची तीव्रता वाढते. उन्हाची तीव्रता वाढत असताना आज प्रथमच औराद परिसरात ४२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे औराद परिसर तापला असून, गर्मीने नागरिक हैराण झाले आहेत. भर दुपारी रस्ते ओस पडू लागले असून, उन्हाच्या वेळी नागरिक शीतपेय केंद्राकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढल्याने थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी असते व गर्मीच्या दिवसांत तापमानात वाढ होते. त्यातच गत ३ दिवसांपासून औराद शहाजानीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना गर्मीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यात वयोवृद्ध व लहान मुलांना अधिक झळा सोसाव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यातून सुटका मिळावी, यासाठी नागरिक दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेत आहेत.

तीन दिवसांपासून तापमान वाढ
गेल्या ३ दिवसांपासून औरादच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात ३१ डिसेंबर रोजी कमाल ४०.०५ तर किमान २६ अंश सेल्सिअस, १ एप्रिल रोजी कमाल ४१ अंश सेल्सिअस व किमान २६ .०५ आणि २ एप्रिल रोजी कमाल ४२ अंश सेल्सिअस व किमान २७.०५ अंश सेल्सिअस झाले असल्याचे औराद येथील हवामान केंद्राचे मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिक डोक्यावर टोप्या, गमच्या, छत्री आदींचा वापर करीत आहेत.

मराठवाड्यात तापमान वाढणार
येत्या काळात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही वर्तवली. त्याची प्रचिती आता यायला सुरुवात झाली असून, याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर, सोलापुरात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

३ महिन्यांत २० दिवस उष्णतेची लाट
देशभरात मार्च महिना अल निनोमुळे सरासरीपेक्षा उष्ण ठरल्याची बाब समोर आली आहे. या महिन्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तसेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांत २० दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR