24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयटीएमसीचे ४२ उमेदवार जाहीर

टीएमसीचे ४२ उमेदवार जाहीर

कोलकाता : सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. पण, आता या आघाडीत जागावाटपावरुन मोठी फूट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

टीएमसीने क्रिकेटपटू युसूफ पठाणला बेरहामपूर मतदारसंघातून तिकीट दिले असून त्यांचा सामना काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. महुआ मोईत्रा कृष्णनगरमधून निवडणूक लढवतील. विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा आसनसोलमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बर्दवान दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या अहलुवालिया यांनी जिंकली होती. विद्यमान खासदार नुसरत जहाँचे तिकीट कापले असून हाजी नुरुल इस्लाम बशीतरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, जगदीश चंद्र बर्मा बसुनिया कूचबिहारमधून निवडणूक लढवतील. पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्ष सयानी घोष जाधवपूरमधून निवडणूक लढविणार आहेत.

टीएमसी-काँग्रेस मिळून लढणार होते : रमेश
तृणमूल काँग्रेसने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आज थेट उमेदवारही घोषित केले. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने अनेकदा पश्चिम बंगालमध्ये टीएमसीसोबत जागावाटपाची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही पक्षांनी मिळून जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा, इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपशी लढावे, अशी आमची इच्छा होती अशी प्रतिक्रिया रमेश यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR