29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमुख्य बातम्या2020 पासून श्रीमंतांची संपत्ती झाली दुप्पट; 5 अब्ज लोक झाले गरीब

2020 पासून श्रीमंतांची संपत्ती झाली दुप्पट; 5 अब्ज लोक झाले गरीब

दावोस : जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत ऑक्सफॅमचा अहवाल सादर करण्यात आला. त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. जगातील पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असताना, 5 अब्ज लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

इलॉन मस्क सर्वात श्रीमंत

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहेत ज्यांची सध्याची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट 182.4 अब्ज डॉलर्ससह दुस-या स्थानावर आहेत.

अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस 176.9 अब्ज डॉलर संपत्तीसह तिस-या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन 135.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आणि मार्क झुकेरबर्ग 132.3 अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहे.

गेल्या चार वर्षात जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींनी दर तासाला 14 दशलक्ष डॉलर्स कमावले. जर आपण ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर ती अंदाजे 116 कोटी रुपये होते. याचा अर्थ जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या 4 वर्षात दर तासाला 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR