28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयएकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले

एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले

तुमकूर : येथील एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले असून मृतांमध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत.

त्यांनी कर्जबाजारीपणा आणि त्यातून झालेला छळ यामुळे जीवन संपवल्याचे त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि स्वत: तयार केलेल्या व्हीडीओतून स्पष्ट केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे तुमकूरचे पोलिस अधीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले. गरीब साब, त्यांची पत्नी सुमैया, मुलगी हाजिरा आणि मुलगा मोहम्मद शाभान आणि मोहम्मद मुनीर अशी मृतांची नावे आहेत. कर्जबाजारीपणा आणि कथित छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने तुमकूर शहरात खळबळ उडाली आहे. मृत कुटुंबीयाने त्यांच्यात इमारतीत राहणारा व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याच्या कुटुंबाचा कसा छळ केला आणि टोकाचे पाऊल उचलले हे व्हीडीओमधून स्पष्ट केले आहे.

पाच जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR