24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमोसादच्या ३ ग्रॅम स्फोटकात ५ हजार जीव होरपळले

मोसादच्या ३ ग्रॅम स्फोटकात ५ हजार जीव होरपळले

उत्तर गाजा : लेबनॉनच्या अनेक शहरांमध्ये लोकांच्या खिशात, हातात असलेले पेजरचा अचानक घरे, रस्त्यावर आणि बाजारात स्फोट होऊ लागल्यानंतर हाहाकार उडाला. लेबनॉन ते सीरियापर्यंत सुमारे तासभर स्फोटांचा क्रम सुरू होता. या बॉम्बस्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले. हिजबुल्लाला लक्ष्य करणारे पेजर बॉम्बस्फोट होते, परंतु यामध्ये नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये इराणच्या राजदूताचाही समावेश आहे. हिजबुल्लाहने बॉम्बस्फोटाचा आरोप इस्रायलवर केला आहे.

पेजर आणि वॉकी-टॉकीनंतर, आता लेबनॉनमध्ये सौर ऊर्जा प्रणालींमध्ये स्फोट होत आहेत. गेल्या दोन दिवसांत तीन प्रकारच्या बॉम्बस्फोटात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांनंतर लोकांच्या मनात मोबाईलला हात लावण्याची भीती आहे. त्याचवेळी हिजबुल्लाहने आपल्या फायटर्सना त्यांच्या फोनच्या बॅटरी काढून फेकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पेजर, वॉकी-टॉकी आणि सेलफोनसह वायरलेस कम्युनिकेशन उपकरणांचा संपूर्ण लेबनॉनमध्ये स्फोट झाले आहेत. यामध्ये ३२ लोक ठार झाले असून ३ हजारहून अधिक जखमी झाले आहेत. निवासी इमारती, अंत्यविधी, किराणा दुकाने आणि न्हाव्याची दुकाने यासारख्या विविध नागरी भागात स्फोट झाले. इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादवर या हल्ल्याचा आरोप होत आहे. तज्ञ्जांनी अशा प्रकारचे हल्ले आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन करू शकतात, असे म्हटले आहे. विशेषत: हे हल्ले अविवेकी असल्याचे म्हटले आहे. बूबी-ट्रॅप केलेली उपकरणे अविवेकी मानली जातात.

नागरी जीवितहानी आणि मानसिक हानी
लेबनॉनमधील या हल्ल्यांमुळे केवळ शारीरिक हानीच झाली नसून सामान्य नागरी भागात उपकरणे ठेवल्यामुळे नागरिकांवर मानसिक आणि भावनिक आघात झाला आहे. यामधील काही बळी हिजबुल्लाह संबंधित होते, परंतु ते लढाऊ नव्हते, असेही म्हटले जात आहे.

संयुक्त राष्ट्राने बैठक बोलावली
इस्रायली हॅकिंग टाळण्यासाठी लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेचे फायटर्स मोबाइल फोनऐवजी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरतात. त्याच वेळी, राजधानी बेरूतमध्ये मोठ्या संख्येने घरांवर सौर यंत्रणा बसविण्यात आली आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्यांचा आरोप इस्रायलवर केला आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली होती.

मोसादवर हल्ल्याचा आरोप
इस्रायलने या हल्ल्यातील सहभागाची पुष्टी केलेली नसली तरी, हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. इस्रायली लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR