18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदेशाच्या अर्थव्यवस्थेत इस्रोचे ५ ट्रिलियनचे योगदान

देशाच्या अर्थव्यवस्थेत इस्रोचे ५ ट्रिलियनचे योगदान

अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती

बंगळूरू : देशाच्या स्वातंर्त्यानंतर भारताला अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागला. त्याकाळी अविकसित देश असलेल्या भारतातील लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नव्हते, अशा काळात अंतराळ क्षेत्रात पुढे जाणे खूप अवघड गोष्ट होती. पण, करफड ने एक-एक पाऊले टाकत आपला प्रवास सुरू केला आणि आज इस्रो जगभरातील टॉपच्या अंतराळ संस्थांमध्ये सामील आहे.

आज जेव्हा आपण इस्रोच्या कामगिरीकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की, भारताने एक देश म्हणून किती प्रगती केली आहे. इस्रोने आतापर्यंत चांद्रयान, मंगळयान, सूर्ययान यांसारखी अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमा पार पाडण्यासाठी इस्रोने फक्त पैसे खर्च केला नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ५ ट्रिलियन रुपयांचे योगदानही दिले आहे.

१ रुपया खर्च करून २.५ रुपये कमावले
नुकताच इस्रोच्या योगदानाबाबत ‘सामाजिक आर्थिक प्रभाव विश्लेषण’ आयोजित करण्यात आला होता. त्याचा अहवाल समोर आल्यावर इस्रोशी संबंधित अनेक अनोखे तथ्य समोर आले आहेत. इस्रोवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, संस्थेने आपल्या मोहिमांवर आणि संशोधनावर जेवढा खर्च केला, त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, इस्रोने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी २.५ रुपये परतावा दिला आहे.

निधीसाठी सरकारवर विसंबून राहू शकत नाही
सोमनाथ म्हणतात, ‘‘चंद्रावर जाणे खूप खर्चीक काम आहे. यासाठी आम्ही केवळ सरकारच्या निधीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे स्पेस सेक्टरच्या व्यवसायात आपल्याला स्थान निर्माण करावे लागेल, जेणेकरून आपण या क्षेत्रात टिकून राहू.

गुणक प्रभावाची गणना पायाभूत सुविधांसाठी
गुणक प्रभावाची गणना विशेषत: पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी केली जाते. यामध्ये सरकार किती खर्च करत आहे आणि याचा अर्थव्यवस्थेला वेगवेगळ्या प्रकारे किती फायदा होत आहे, हे पाहते. उदाहरणार्थ, सरकारने रस्ता बांधला, तर किती लोकांना रोजगार मिळाला, मालमत्तेचे मूल्य किती वाढले, इंधनाची अर्थव्यवस्था किती सुधारली आणि किती लोकांचे जीवन बदलले, अशा अनेक घटकांची गणना केली जाते. हे त्याचे एकूण गुणक प्रभाव दर्शवते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR