बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर महत्त्वाची माहिती दिली. या प्रकरणात एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी ५० लाख रुपये दिले गेले आहेत.
दीड कोटी रुपये राहिले आहेत. दीड कोटी रुपये राहिले तर माणसे कोणी पाठवले. ते माणसे डायरेक्ट आकांनीच पाठवले. आकांनीच सांगितले होते. आकांनीच सांगिल्यावर हे लोक शुक्रवारी तिथे गेले होते. आता काय आहे, सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले हे सर्व बाहेर येत आहे. त्यामुळे मला नाही वाटत की, आका यातून बाहेर राहतील असे सुरेश धस म्हणाले. बकरे की माँ कब तक दुआ मांगेगी. सगळा फोकस हा आता आका पकडण्याकडे गेल्यामुळे इतर आरोपी राहिले असावेत. इतर लोक देखील लवकरात लवकर पकडले जातील. ते सुद्धा आतमध्ये होतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, यात मी कुणाला सोडणार नाही. त्यावर लोकांचा विश्वास आहे असे सुरेश धस म्हणाले.
प्रकरणात अनेक टॉप सिक्रेट्स
हे बघा मी एसपींना याबाबत बोललो. एसपी साहेब बोलले की साहेब, काही टॉप सिक्रेट्स आहेत. साहेब आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. ते खरे आहे आणि योग्य आहे ना. माहिती लिकेज झाली तर ती माहिती आरोपींपर्यंत जावून पोहोचू शकते. कारण त्यांना अनेक लोक प्रश्न विचारत असतील. विरोधी लोक, सत्ताधारी लोक विचारत असतील. एसपी सर्वांना सांगत गेले की, आम्ही असा तपास करतोय, तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात टॉप सिक्रेट्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही. मी म्हटलं की, ओके. त्यांच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत हे मला कळत आहे अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.