20.2 C
Latur
Saturday, November 30, 2024
Homeमहाराष्ट्रशिव्या द्याल तर ५०० रुपये दंड

शिव्या द्याल तर ५०० रुपये दंड

अहिल्यानगर : प्रतिनिधी
शिव्या.. हे अनेकदा भांडण होण्याचे मूळ कारण असते. मात्र आता या शिव्या देणा-यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्याचा ठराव यावेळी ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावानुसार जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे रु. दंड सक्तीने आकारण्यात येईल. शिव्या देताना आईचा आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयवासंदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्च शब्द वापरून स्त्रीदेहाचा अपमान केला जातो.
त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून महिला-भगिनींचा सन्मान केला असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले आहे. माझ्या पंधरा वर्षांच्या कालावधीत या निर्णयासह अनेक धोरणात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR