21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर५४९ कोटींचा शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प अहवाल तयार

५४९ कोटींचा शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प अहवाल तयार

लातूर : प्रतिनिधी
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.० अंतर्गत लातूर शहराची २०५७ सालाची लोकसंख्या गृहीत धरुन लातूर शहर महानगरपालिकेने शहराकरिता पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) तयार करण्यांत आला असुन त्याची एकुण किंमत ५४९.३२४६ कोटी एवढी आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असुन शहराकरिता योजना मंजुर झाल्यास पाणी पुरवठा बळकटीकरणाचे ध्येय व कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेची शाश्वती निर्माण होणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यास यामुळे मदत होणार आहे.

लातूर शहराला केज तालुक्यातील धरेगाव येथील मांजरा या मोठ्या प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या धरणापासून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईनद्वारे रॉ वॉटर घेतले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करुन ते पाणी पाईप लाईनद्वारे शहरातील दहा ते बारा जलकुंभांना पुरवले जाते. जलकुंभावरुन शहराच्या त्या त्या भागात पाणी पुरवठा होतो. मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठयाला अडचण आली तर नागझरी बराज, साई बराजमधूनही काही प्रमाणात लातूर शहरासाठी पाणी घेतले जाते. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान १.० अंतर्गत लातूर शहरातील पाणी पुरवठा योजना सक्षम करण्यात आली. शहरात काही ठिकाणी जलकुंभ उभारणे, जुन्या जलवाहिन्या काढून त्या ठिकाणी नव्याने जलवाहिन्या अंथरणे, शहराच्या विस्तारीत भागात जलवाहिन्या अंथरणे, नळाद्वारे पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

अमृत अभियान २.० अंतर्गत लातूर शहराची २०५७ सालाची लोकसंख्या गृहीत धरुन लातूर शहर महानगरपालिकेने शहराकरिता पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) तयार करण्यांत आला असुन त्याची एकुण किंमत ५४९.३२४६ कोटी एवढी आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. ही योजना मंजूर झाल्यास शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण होणार आहे, अशी माहिती लातूर शहर महानगरपालिका पाणीपूरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR