38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयकारची ‘स्टेपनी’ बदलताना काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार

कारची ‘स्टेपनी’ बदलताना काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार

 

रेवाडी : हरियाणातील रेवाडी येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्­या भीषण रस्­ते अपघातात ६ जण ठार झाले. कारची ‘स्टेपनी बदलाताना ही दुर्घटना घडली. मृत हे एकमेकांच्­या शेजारी राहणारे आहेत. देवदर्शन करुन गाझियाबादला परत येत असताना ही दुर्घटना घडली.

गाझियाबादच्या अजनारा ग्रीन सोसायटीत राहणारे खातू धामला देवदर्शनासाठी गेले होते. खातू श्यामचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण इनोव्हा बुक करून दिल्लीहून निघाले होते. रेवाडीहून धरुहेरा रस्त्याने जात असताना मसाणी गावाजवळ त्यांची कार पंक्चर झाली. ड्रायव्हर आणि इतर पंक्चर झालेल्या स्टेपनीला बदलण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक रस्त्याच्या कडेला गाडीजवळ बसले होते तर काही लोक गाडीच्या आत बसले होते.

‘एसयूव्ही’ची भीषण धडक
मसाणी गावाजवळ इनोव्हा चालक स्­टेपनी बदलत होता तर त्­याच्­या शेजारी पाच जण उभे होते. यावेळी एका एसयूव्हीने त्­यांना भीषण धडक दिली. या अपघाता चालक विजय, शिखा, पूनम, नीलम आणि रंजना कपूर हे जागीच ठार झाले. एसयूव्हीमधील पाच जण जखमी झाले आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR