जळगाव : प्रतिनिधी
लग्नसराई म्हटले की सोन्याचे दागिन्यांना मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या १० दिवसात सोने तब्बल ३०४१ रुपयांनी महागले आहे. परिणामी सर्वसामान्यांनी सोने खरेदी करायचे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दागिन्यात वाढ झाल्यामुळे खरेदीदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आज (११ मार्च) सोन्याची किंमत जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६६,१९० रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत ६६,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
तर सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे लग्नाचा हंगाम नसून इतर कारणे आहेत. केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया सोन्याच्या किमतीत विक्रमी उच्चांक गाठण्यामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले, की कॉमेक्स आणि एमसीएक्सवर सोन्याच्या किमती नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणात अपेक्षित बदल झाल्यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे.