31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयराजस्थानमध्ये दोन कारच्या धडकेत ६ ठार

राजस्थानमध्ये दोन कारच्या धडकेत ६ ठार

सीकर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात दोन कारच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. १५) लक्ष्मणगड तहसीलमधील महामार्गावर घडली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच खासदार सुमेधानंद आणि आयजी सीकर यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींशी चर्चा केली.

हा अपघात लक्ष्मणगढ शहराजवळ महामार्गावर असलेल्या मणिमहल हॉटेलसमोर घडला. मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून बोलेरोतून हे लोक दातरामगड येथील खरियावास या गावी जात होते. तर इर्टिगा कार सीकरहून लक्ष्मणगडच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR