23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणात ६ नक्षलवादी ठार

तेलंगणात ६ नक्षलवादी ठार

सुरक्षा दल, नक्षलवाद्यांत चकमक, २ जवान जखमी

हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत ६ नक्षलवादी ठार तर २ जवान जखमी झाले आहेत. यातील एका सुरक्षा कर्मचा-याची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांत छत्तीसगडचा मोस्ट वॉन्टेड माओवादी लचन्नाचाही समावेश आहे. काही दिवसांपासून तो तेलंगणाच्या जंगलात वावरत होता.

भद्राद्री कोठागुडेमचे एसपी रोहित राज यांनी सांगितले की, आज सकाळी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सीपीआयचे (माओवादी) मनुगूर क्षेत्र समिती सचिव लचन्ना याचाही समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ९ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणण्यात आले होते. दंतेवाडा-विजापूरच्या जंगलात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार झाले होते.

दंतेवाडा एसपी गौरव राय यांनी सांगितले की, चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात एसएलआर, ३०३ आणि ३१५ बोअर रायफल जप्त करण्यात आल्या. या कारवाईत सहभागी असलेले सर्व सुरक्षा कर्मचारी सुरक्षित आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी जवानांच्या शौर्याचे कौतुक करत भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नक्षलवादाशी लढा देत असून लवकरच त्यांचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, असे सांगितले.

शस्त्रास्त्रे, दारुगोळा जप्त
चकमकीनंतर तेलंगणा ग्रेहाऊंड्सने नक्षलवाद्यांच्या अड्ड्यांमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लचन्ना दलम नीलाद्रीपेठच्या जंगलात बराच काळ सक्रिय होता आणि छत्तीसगडमधून आल्यावर आपले ऑपरेशन चालवत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR