नवी दिल्ली : पुन्हा एकदा शेकोटीने अख्खं कुटुंब संपवलं आहे. दिल्लीत झोपेत गुदमरून ६ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत शनिवारी रात्री दोन भीषण दुर्घटना घडल्या.
पहिली घटना उत्तर दिल्लीतील बा खेडा भागात घडली. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी एका कुटुंबाने शेकोटी पेटवली पण या शेकोटीनेच त्यांचा जीव घेतला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा अपघात इंद्रपुरी येथे घडला. तेथे दोन जणांचा मृत्यू झाला.
खेडा परिसरात एका घरात ४ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घरातून पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. दरवाजा आतून बंद होता. खोलीत शेकोटी पेटलेली होती.
प्राथमिक तपासानुसार, कुटुंबाने थंडीपासून वाचण्यासाठी चुल पेटवली असावी. धुरामुळे गुदमरून सर्वांचा मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. या चार जणांपैकी दोन लहान मुलांचाही समावेश आहे. एका मुलाचे वय ७ वर्षे, तर दुस-याचे वय ८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.अशीच आणखी एक दुर्घटना इंद्रपुरी परिसरात घडली. तिथे शेकोटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.