मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ६१ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशभरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.
राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने डोके वर काढले असून पुण्यात नवीन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरून सोमवारी राज्यात ६१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७० रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. राज्यात रिकव्हरी रेट ९८.१७ टक्के नोंदवण्यात आला आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.८१ टक्के आहे.
सोमवारी राज्यात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी महाराष्ट्रात एकूण २,७२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १,४३९ आरटीपीसीआर तर १३०५ आरएटी चाचण्यांचा समावेश आहे. राज्यात २५० रुग्णांना जे१ या नवीन कोरोनाच्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट असलेल्या जे१ चे एकूण ६८२ रुग्ण होते. ६ जानेवारीपर्यंत देशभरातील १२राज्यांत कोरोना नवीन व्हेरिएंटच्या जे१ चे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते.
पुण्यात नवीन व्हेरिएंटचे सर्वांत जास्त रुग्ण राज्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पुण्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे.