23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरकिल्लारीत ग्रामपंचायतीसाठी ६५ टक्के मतदान

किल्लारीत ग्रामपंचायतीसाठी ६५ टक्के मतदान

किल्लारी : वार्ताहर
तालुका होऊ पाहणा-या औसा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायची निवडणूक मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडली. सरपंच पद सवसाधारण (खुला) महिलेसाठी आरक्षीत असल्याने ही निवडणूक अत्यंत चूरशीची व प्रतिष्ठेची ठरली. १९९९ नंतर प्रथमच सर्वसाधारण महिलेस सरपंच पदासाठी संधी उपलब्ध झाली आहे. किल्लारी ग्रामपंचायत ही एकूण सतरा सदस्यांची आहे. एका सरपंच पदासाठी चार महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर सतरा सदस्यांसाठी ५२ उमेदवार ंिरगणात होते.

मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडू एकूण ७ ठिकाणी मतदानाची सुविधा करण्यात आली होती. जिल्हा परिषद कन्या शाळा, महाराष्ट्र विद्यालयात दोन, जिल्हा परिषद शाळा डावी बाजू किल्लारी वाडी, जिल्हा परिषद शाळा किल्लारी साखर कारखाना, जिल्हा परिषद शाळा भाग दोन किल्लारी शिवाजी विद्यालय, महिला स्वावलंबन केंद्र. अशा सात ठिकाणी एकूण सोळा बुथवर मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण वार्ड क्रं १ मध्ये, ११९३ वार्ड क्रं २ मध्ये १५९७,वार्ड क्रं ३ मध्ये ७९२ वार्ड क्रं ४ मध्ये १५९२ तर वार्ड क्रं ५ मध्ये ८२३ वार्ड क्रं ६ मध्ये १२६७ इतके मतदान झाले असून एकूण १२३९७ मतदारापैकी ७१९६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे कांहीं जाणकार सांगतात. आज निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याचे किल्लारीकरांसह उमेदवारांनाही उत्सुकता लागली आहे. या वेळी मतदान केद्रावर कुठाल्याही प्रकारचा आनुचित प्रकार घडला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR