जिंतूर : तालुक्यातील खरदडी येथील जगदंबा देवीच्या मंदिरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सोन्याच्या, दागिन्यांसह एकुण ६५ हजारांचा लंपास केला आहे. ही घटना २० जुलै रोजी मध्यरात्री घडली आहे. या संदर्भात २१ जुलै रोजी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील मौजे खरदडी गावातील जगदंबा माता देवीच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्या प्रकरणी मंदीराचे पुजारी हरी तारु जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या नमूद करण्यात आले आहे की २० जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदीराचे गेटवर असलेले कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करुण जगदंबा देवीच्या मंदिरातील २५ हजार रुपयांचे एक सोन्याचे सेवनपीस ज्यामध्ये सोन्याचे सात पाने व सोळा मनी असे एकुण पाच ग्राम असलेले, २१ हजार ५०० रुपयांची सोन्याचे मनीमंगळसुत्र ज्यामध्ये दोन डोरले व सहा मनी असे एकूण साडेचार ग्राम, १७ हजार ३५० रुपयांची एक सोन्याची दांडी नथ ज्यामध्ये गोल आकाराची सोन्याची दांडी व दोन सोन्याचे मनी व तांबडा खडा असलेली ७५० रुपयांची दोन चांदीचे पायातील जोडवे एक तोळा असे एकुण ६४ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. पो.नि. बुध्दराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊपनि बुध्देवार तपास करत आहेत.