31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई विमानतळावर पावणे ७ किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर पावणे ७ किलो सोने जप्त

मुंबई : सोन्याचा भाव ९९ हजारांच्या घरात असताना बँकॉकमधून आणलेले तब्बल पावणे ७ किलो वजनाचे सोने मुंबई विमानताळावरून अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने डीआरआयने जप्त केले आहे. या प्रवाशाची अंगझडती करण्यात आली. यात प्रवाशाने घातलेल्या बुटात १४ सोन्याचे बार सापडले. बँकॉकहून मुंबईला जाणारे विमान टीजी ३१७ ने प्रवास करणा-या एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रवाशाला सोने तस्करीसाठी कोणी दिले? या मागे कोणत्या टोळीचा हात आहे का? याचा तपास डीआरआयचे अधिकारी करत आहेत.

मुंबईत अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने डीआरआयच्या पथकाला मोठे यश मिळाले असून बँकॉकमधून मुंबई विमानतळावर एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून अंगझडतीत प्रवाशाने घातलेल्या बुटात १४ सोन्याचे बार सापडले असून त्याचे एकूण वजन ६७३५.४२ ग्रॅम एवढे होते. या सोन्याची साधारण किंमत ६.३० कोटी रुपये एवढी आहे. तस्करी केलेले हे सोने जप्त करण्यात आले आहे. प्रवाशाला तसेच खरेदीदाराला सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी हे सोने तस्करीसाठी कोणी दिले. या मागे कुठल्या टोळीचा हात आहे का? याचा तपास डीआरआयचे अधिकारी करत आहेत.

या घटनेमुळे मुंबई विमानतळावरून सोने तस्करीसाठी होणारे प्रयत्न पुन्हा एकदा उघड झाले आहेत. डीआरआयच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात तस्करी रोखण्यात यश मिळाले असून या प्रकारामुळे तस्करीच्या पद्धती आणि त्यामागील रचनेचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR