23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeधाराशिवधाराशिव येथे लेखापालची ७.५ लाखांनी ऑनलाईन फसवणूक

धाराशिव येथे लेखापालची ७.५ लाखांनी ऑनलाईन फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील जिल्हा कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल संतोष केरबा सरनाईक यांची सायबर भामट्यांनी ७ लाख ४९ हजार ६७९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी सात भामट्यांच्या विरोधात धाराशिव येथील सायबर पोलिस ठाणे येथे दि. १७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, करवीर (जि. कोल्हापूर) तालुक्यातील संतोष केरबा सरनाईक (वय ३५) वर्षे, हे धाराशिव शहरातील जिल्हा कोषागार कार्यालयात कनिष्ठ लेखापाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. ते बी अ‍ॅन्ड सी क्वॉर्टर, कोहीनुर हॉटेलच्या पाठीमागे आनंदनगर, धाराशिव येथे राहतात. त्यांना ४ मे ते १४ मे २०२४ या कालावधीत अनोळखी सात व्यक्तींनी विविध मोबाईल नंबरवरून विविध बँकेच्या खात्यावर ते कार्यालयात व घरी असताना ऑनलाईन पध्दतीने पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली.

टेलीग्राम अ‍ॅप वर लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरण्यास सांगितले. वेगवेगळ्या प्रकारचे टेलीग्राम अ‍ॅप वरील टास्क देवून पैसे भरण्यास सांगितल्याने फिर्यादी संतोष सरनाईक यानी आरोपीचे बँक खात्यावर एकुण ७ लाख ४९ हजार ६७९ रूपये फोन पे व आर.टी.जी.एस द्वारे पाठवले व टास्क पूर्ण करुन जास्त पैसे मिळवण्याचे आमीष दाखविले.

आरोपींनी रक्कम भरण्यास सांगुन फिर्यादीचे सदरची रक्कम परत मिळणे बाबत मोबाईल फोन व मेसेज द्वारे विचारणा केली असता आरोपींनी तुला काय करायचे ते करुन घे, असे म्हणून फिर्यादीने भरलेले पैसे परत न देता फसवणूक केली आहे. या प्रकरणी संतोष सरनाईक यांनी दि. १७ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव येथील सायबर पोलीस ठाणे येथे ४२०, सह ६६ सी, ६६ डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR