22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्गातील वेंगुर्लेत बोट उलटून दोघांचा बुडून मृत्यू

सिंधुदुर्गातील वेंगुर्लेत बोट उलटून दोघांचा बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग : उजनीच्या पात्रात बोट बुडून एक मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बोट दुर्घटना घडली. सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून जाणारी ही बोट उलटली. यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोनजण बेपत्ता झाले आहेत तर यातील तीन खलाशी हे पोहत किना-यावरआल्याने ते सुदैवाने बचावले आहेत. या बोटीत ७ जण होते.
दरम्यान, बोट उलटून दुर्घटना थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी उजनीच्या पात्रात बोट बुडून दुर्घटना घडली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत तर एसडीआरफच्या पथकाचीच बोट उलटली होती. त्यानंतर आता सिंधुदुर्ग-वेंगुर्ले बंदरातून जाणारी ही बोट उलटली. यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्याच दरम्यान काल रात्री वेंगुर्ले बंदरात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन बोट घेऊन जात असताना अचानकपणे ती बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहत पोहत किनारपट्टी गाठली मात्र बाकीचे ४ जण मात्र बेपत्ता झाले. यातील २ जणांचे मृतदेह सापडले तर दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रात्री ढगांचा गडगडाट, जोरदार वादळी वा-यामुळे ही बोट भरकटली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्य प्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. महत्त्वाची बाब म्हणजे मागील ३ दिवसांत बोट बुडाल्याची ही तिसरी घटना आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR