धाराशिव : धाराशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायत येथे बनावट दस्तऐवज तयार करून ७३ लाख ५६ हजार ५७६ रुपयांचा अपहार केल्याची बाब उघड झाली असून याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात तत्कालीन तीन ग्रामसेवक व सरपंच सह पाच जनावर बेंबळी पोलीस ठाण्यात २२ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बेंबळी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बेंबळी आरोपी नामे-सुरेखा हनुमंत बनकर( वय ५५ वर्षे, सरपंच, सुभाष महादेव कळसुले, (वय ४४ वर्षे, दोघे रा. करजखेडा ता. जि. धाराशिव) एस. बी. आहिरे वय ५० वर्षे, व्यवसाय- ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय भिकार सारोळा, अयोध्या शंकर शिंदे, (वय ५० वषे ) महेश राजेंद्र सावंत,(४८ वर्षे, ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय पाटोदा ता. जि. धाराशिव).
यांनी सन २०१८ ते २०२२ दि. १८ जुलै २०२२ रोजी वेळोवेळी ग्रामपंचायत करजखेडा येथील शासकिय कामकाजाची बनावट दस्तएवज तयार करुन वित्तआयोगाच्या मंजुर निधी ७३,५६,५७६ स्वत:चे फायद्यासाठी गैरवापर करुन शासनाची फसवणुक केली, असा मा. बी.एम. कोठावळे, प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या आदेशान्वये कलम १५६ (३) अन्वये आदेश प्राप्त झाल्या वरुन फिर्यादी ज्ञानेश्वर जग्गनाथ गरड, वय ४० वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि. २२ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार बेंबळी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.