29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसोलापूरशोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल पांगरी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल पांगरी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

बार्शी : स्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल पांगरी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणास प्रमुख पाहुणे म्हणून पांगरी पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रतापसिंह जाधव , रेल्वे शासकीय ठेकेदार शितल जानराव, सिद्धराम मोरे, बिभीषण गरड यांची उपस्थिती होती.

सूत्रसंचालन सना शेख यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व ध्वजारोहणाने करण्यात आली. ध्वजारोहण प्रतापसिंह जाधव , शितल जानराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले व उपस्थित पालक व ग्रामस्थांनी ध्वजास सलामी दिल्यानंतर भारतीय संविधानाचे विद्यार्थ्यांनी वाचन केले. मुलींनी भारतीय संस्कृती वेशभूषेत स्वागत गीत व ध्वजगीत गायिले. संस्थेचे संस्थापक विनायक बिभिशण गरड यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत केले. लहान गटातील मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शेतकरी, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. त्यानंतर शाळेतील सर्व मुलांनी कवायत संचालन केले. कराटे शिक्षक शेख यांनी कराटेचा डेमो दिला. यानंतर स्टेट लेवल कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्रांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता खाऊवाटपाने झाली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR