29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeराष्ट्रीयअरूणाचलमध्ये भाजपचे ८ उमेदवार विजयी!

अरूणाचलमध्ये भाजपचे ८ उमेदवार विजयी!

इटानगर : अरुणाचल प्रदेश मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल रोजी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्याआधीच भारतीय जनता पक्षाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आणि अनेकांचे अर्ज रद्द करण्यात आल्याने आठ उमेदवार विजयी होणे औपचारिकता राहिली.

भाजपच्या आठ उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा देखील समावेश आहे. पेमा खांडू हे सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याआधी, पेमा खांडू यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. या जागेवर २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत पेमा खांडू बिनविरोध निवडून आले होते.

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी पार पडतील. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात हे मतदान होईल. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभेच्या जागा आहेत, तर लोकसभेच्या दोन जागा आहेत.

अरुणाचल पश्चिम आणि अरुणाचल पूर्व या दोन लोकसभा मतदारसंघासाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला. राज्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च पर्यंत होती. राज्यात विधानसभेसाठीची मतमोजणी २ जून रोजी होईल. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागेल.

भाजपचे विजयी उमेदवार
अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्ता विधानसभेच्या जागेवरुन, एर हेज अप्पा जीरो जागेवरुन, रोइंग जागेवरुन मुच्चू मीठी, सगाली जागेवरुन एर रातू तेची, ईटानगरमधून तेची कासो, ताली जागेवरुन जिक्को ताको, तलिहा जागेवरुन न्यातो डुकोम यांचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार दासंगलू पूल यांनीही हयुलियांग मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्या अंजॉ जिल्ह्याच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR