38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यापोपट बसमध्ये बसले, कंडक्टरने तिकीट आकारले!

पोपट बसमध्ये बसले, कंडक्टरने तिकीट आकारले!

बेंगळुरु : कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजे ‘केएसआरटीसी’च्या कंडक्टरने चक्क चार पोपटांना तिकीट आकारले. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरुतून म्हैसुरला निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला. यावेळी कंडक्टरने ४४४ रुपयांचे तिकीट आकारले आहे. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे

एक महिला आपल्या नातीसोबत प्रवास करत होती. छोट्या मुलीसोबत चार पोपट होते. एका पिंज-यामध्ये हे चार पोपट कैद होते. कर्नाटकातील शक्ती योजनेनुसार राज्यात महिलांना बस प्रवास मोफत आहे. त्यामुळे महिला आणि छोट्या मुलीला तिकीट काढावे लागले नाही. पण, कंडक्टरने त्यांच्यासोबत असलेल्या चार पोपटांचे तिकीट दिले. कंडक्टरने पोपटांना प्रवाशी म्हणून गृहित धरले आणि त्यांना प्रत्येकी १११ रुपये असे ४४४ रुपयांचे तिकीट दिले.

‘केएसआरटीसी’मध्ये प्राण्यांच्या प्रवासावर अर्धे तिकीट आकारले जाते. प्राण्यांचे तिकीट काढले नाही तर संबंधित प्रवाशाला दंड भरावा लागू शकतो. तसेच, कंडक्टरने प्राण्यांचे तिकीट न काढल्याचे आढळल्यास त्याचे निलंबन केले जाऊ शकते, तसेच इतर शिक्षा देखील त्याला होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR