27 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई - गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार

मुंबई – गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार

मुंबई : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपुर होळी विशेष (८ फेऱ्या) 05326 विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि. १३.०३.२०२५ ते दि.२४.०३.२०२५ पर्यंत गुरुवार आणि सोमवारी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि गोरखपुर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८.०० वाजता पोहोचेल.

(४ फेऱ्या) 05325 विशेष ट्रेन गोरखपुर येथून मंगळवार आणि शनिवारी दि. ११.०३.२०२५ ते दि. २२.०३.२०२५ पर्यंत १९.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानी कमलापति-भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई-झांसी, उरई, गोविन्दपुरी, प्रयागराज, अयोध्या, मनकापुर आणि खलीलाबाद.

संरचना: ४ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 05326 च्या फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.०३.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR