28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeराष्ट्रीयकुटुंबातील ८ जण ढिगा-याखाली दबले

कुटुंबातील ८ जण ढिगा-याखाली दबले

खोदकाम सुरू असताना मोठी दुर्घटना

यमुनानगर, प्रतिनिधी
हरियाणामधून मोठी बातमी समोर आली आहे. यमुनानगरमध्ये मोठा अपघात झाला आहे. मातीचा ढिगारा कोसळल्यानं आठ जण या ढिगा-याखाली दबले गेले. यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
तर सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मातीचा ढिगारा कोसळल्याचं लक्षात येताच त्या परिसरात असलेल्या शेतक-यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. या घटनेमध्ये एकूण आठ जण आडकले होते. यामध्ये मुलांचा देखील समावेश आहे. यातील सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. ते या घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार यमुनानगरच्या साढौरामध्ये ही घटना घडली आहे. रमजानचा महिना सुरू आहे. रमजाननिमित्त घराच्या रंगरंगोटीचं आणि सजावटीचं काम सुरू होतं. घराची थोडी पडझड झाली होती, त्याचं बांधकाम देखील करण्यात येणार होतं. त्यासाठी आवश्यक असणारी माती आणण्यासाठी हे सर्व जण शेतात गेले होते. मात्र खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला, या ढिगा-याखाली हे आठही जण दबल्या गेल्या.

आठ जणांमध्ये दोनं लहान मुलं, पाच महिला आणि एका तरुणाचा समावेश होता. यापैकी सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मातीचा ढिगारा कोसळल्याचा आवाज ऐकल्यानंतर या परिसरात असलेल्या शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. त्यामुळे सहा जाणांचा जीव वाचला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR