17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयकु-हाडीने वार करून कुटुंबातील ८ जणांची हत्या

कु-हाडीने वार करून कुटुंबातील ८ जणांची हत्या

घटनेनंतर स्वत:ही आयुष्य संपविले

भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडामधे मन हेलावून टाकणारी घटना घडली असून एका युवकाने आपल्या कुटुंबातील ८ जणांची हत्या करून स्वत: फाशी घेत आत्महत्या केली आहे. आरोपीने आधी पत्नीवर कु-हाडीने वार केला, त्यानंतर आई-बहीण, भाऊ-वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची केली हत्या आहे.

एवढेच नाही, मामाच्या घरी जात त्याने १० वर्षांच्या मुलीवर हल्ला केला मात्र ती पळून गेल्याने तिचा जीव वाचला. आरोपीने हत्या का केली याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण, त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याचे सांगितले जाते. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनास्थळी भेट देत निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. महुलजिर पोलिस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल बोदल कचार गावातील ही घटना आहे. सकाळी २ ते ३ वाजताच्या सुमारास हा थरकाप उडवणारा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी संपूर्ण गाव सील केले आहे. छिंदवाडाचे पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. याशिवाय तो कोणत्या नशेच्या अमलाखाली होता का? हे तपासले जात आहे. रिपोर्टनुसार, त्याच्यामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण कुटुंबालाच संपविले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन कु-हाड जप्त केली आहे. गावक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नुकतेच लग्न झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR