22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमनोज जरांगेंमुळे ८ खासदार निवडून आले

मनोज जरांगेंमुळे ८ खासदार निवडून आले

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे ओवेसींनी व्यक्त केले मत

छ. संभाजीनगर : एक महिना झाला. वेळ संपला. मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, असे आवाहन सरकारला करतानाच मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे हे ठरवू, अशी पुढील रणनीती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी घोषित केली. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी ठाम भूमिका घेतली आहे. यातच एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, असे म्हटले आहे.

ओवेसी म्हणाले की, मुस्लिमांनी मनोज जरांगे यांच्याकडून शिकावे. मनोज जरांगे यांनी बोलावल्यास विचार करू. मनोज जरांगे यांचा आदर करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो. मनोज जरांगेंमुळे ८ खासदार निवडून आले. परंतु, एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला आहे. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात. पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.

आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचे दु:ख आहे. मुस्लिम जनतेने सर्वांना मतदान केले, मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे. मनोज जरांगे प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करू. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का ंिजकत नाही. महाराष्ट्र असलेल्या ११ टक्के मुस्लिमसाठी दु:ख आहे. त्यांच्याकडून बोलणे होत असेल तर नक्की बोलू, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश
मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहेत. मोदी म्हणतात मी बॅकवर्डचा नेता आहे. मग आरक्षणाच्या टक्क्याबाबतचे विधेयक संसदेत आणा. महाराष्ट्राने मुस्लिम उमेदवार दिला नाही. आमचा एक उमेदवार होता, त्याला सर्वांनी मिळून हरवले. आम्हीच फक्त भाजपचा विरोध करत आहोत. आम्ही जिंकण्यासाठी लढतो, कुणाला पाडण्यासाठी लढत नाही असे ओवेसी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR