37.4 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeराष्ट्रीयसिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले

सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले

नागरकुरनूल : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील डोमलापेंटा येथे एसएलबीसी बोगद्यात झालेल्या अपघातात एका वरिष्ठ अभियंत्यासह आठ कामगार अडकले आहेत. पंतप्रधानांनी तात्काळ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत बचावकार्य सुरळीत पार पाडले पाहिजे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अचानक पाणी आणि चिखलाचा लोट वाहत असल्याने बोगद्या काही भाग खचला. त्यामुळे सुमारे ८ किलोमीटरचा खड्डा पडला. बोगद्याच्या बोअरिंगच्या कामात सहभागी असलेल्या जेपी असोसिएट्स आणि रॉबिन कंपनीने सांगितले की, सकाळी ८ वाजता काम सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांनी ही घटना घडली.

बोगदा खचण्यापूर्वी मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर पाणी आणि चिखल वेगाने बोगद्यात शिरला, ज्यामुळे कामगारांना सुरक्षिततेसाठी पळावे लागले, असे म्हटले जाते. टीबीएमजवळ असलेले कामगार सुरक्षितपणे बाहेर पडू शकले, परंतु बोगद्याच्या पुढील भागात काम करणारे कामगार अडकले. खोदकाम लगेचच थांबवण्यात आले आणि शक्य तितक्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. तरीही आठ कामगार आत अडकले.

अडकलेल्या कामगारांसाठी सुसज्ज व्यवस्था अजूनही कार्यरत आहे. तेथे ऑक्सिजनचा पुरवठा कायम ठेवण्यात आला आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके पूर्ण तयारीने घटनास्थळी तैनात आहेत. आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टरही सज्ज आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR