22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरमधील ८० टक्के रेस्टॉरंट स्वच्छतेत ‘नापास’

नागपूरमधील ८० टक्के रेस्टॉरंट स्वच्छतेत ‘नापास’

एफएसएसएआयच्या पाहणीतील चिंताजनक वास्तव

नागपूर : चटपटीत, स्वादिष्ट खाद्यपदार्थ कुणाचीही पहिली पसंत. स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थांसाठी खवय्यांची शोधाशोध सुरूच असते. मात्र, शहरातील खाद्यसंस्कृती वाढत असताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन होते का, हा प्रश्न आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अलिकडेच शहरातील २०० रेस्टॉरंटची पाहणी केली असता ८० टक्के रेस्टॉरंट स्वच्छतेच्या निकषात फेल ठरल्याचे दिसून आले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, यासाठी त्रुटी दूर करा, असे निर्देश एफएसएसएआयने दिले आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. काम आटोपले की रेस्टॉरंटमध्ये जाऊन आवडीचे पदार्थ खाण्याकडे कल असतो. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्या स्वच्छतेच्या निकषांचे पालन व्हावे यासाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानके कायद्याचे पालन होते की नाही, याची पाहणी करणारी यंत्रणा कार्यरत आहे.

याचाच भाग म्हणून शहरात अलिकडेच एफएसएसएआयचा चमू येऊन गेला. यात अनेक रेस्टॉरंटमध्ये नियमांचे पालन करीत सुरक्षात्मक नियमांचे पालन होत असल्याचे आढळले. काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे रीतसर परवानगी होती. हातमोजे आणि डोक्यावर कॅप घालूनच ते विक्री करीत होते. मात्र, अनेक खाद्यविक्रेत्यांकडे अस्वच्छताच आढळून आल्याचे या ऑडिटमधून पुढे आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR