31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमधील ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार

नाशिकमधील ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार

नाशिक : राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा हद्दीत मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दोन दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर एक पोस्ट शेअर करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत ८०० कोटींचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन. तो पर्यंत लाभार्थींनी शांत झोपावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचे नेमके प्रकरण आहे तरी काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच संजय राउतांच्या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन याने पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. यावरून संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या प्रकरणात अनेक रहस्य आहेत. पोलिस कोठडीत एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला. याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचे गृहमंत्रालय, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR