16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीड जिल्ह्यात ८१ बंडखोर; विजयाचे गणित बिघडवणार

बीड जिल्ह्यात ८१ बंडखोर; विजयाचे गणित बिघडवणार

बीड : विशेष प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात यावेळी विधानसभा निवडणुकीत तब्बल १३९ उमेदवार ंिरंगणात उतरले आहेत. यामध्ये ५८ उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत, तर तब्बल ८१ उमेदवार हे ‘हम भी किसी से कम नहीं’ म्हणत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. आता हेच अपक्ष उमेदवार महायुती, महाविकास आघाडीसह प्रमुख बंडखोरांच्या मतांचे विजयाचे गणित बिघडवणार असल्याचे दिसत आहे. आम्हाला पण हलक्यात घेऊ नका, असा इशारा या अपक्षांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना दिला आहे.

जिल्ह्यातील बीड, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि गेवराई या सहा विधानसभा मतदारसंघांत ४०७ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले होते. यातील ३० अर्ज हे स्वाक्षरी नसण्यासह इतर कारणांमुळे अवैध ठरले. २३८ जणांनी माघार घेतली असून, आता १३९ जण निवडणूक रिंगणात आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परळी आणि केज वगळता इतर ठिकाणी बंडखोरी केली आहे.

मतदारसंघ – अपक्ष – एकूण उमेदवार
गेवराई – १२ – २१
केज – १४ – २५
माजलगाव – २२ – ३४
आष्टी – ९ – १७
परळी – ५ – ११
बीड – १९ – ३१
एकूण – ८१ – १३९

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR