25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeसोलापूरराष्ट्रीय महामार्ग, पुलासाठी ८१५ कोटी निधी मंजूर

राष्ट्रीय महामार्ग, पुलासाठी ८१५ कोटी निधी मंजूर

अक्कलकोट – अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील एका राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ५८० कोटी रुपये तसेच दुसऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण पूर्वीच्या कामासाठी २०० कोटी रुपये (कामाच्या पूर्वतयारीसाठी) तसेच अक्कलकोट दुधनी मार्गावरील बोरी उमरगे येथील गावाजवळील पुलाची उंची वाढवण्यासाठी ३५ कोटी रुपये असा एकूण तब्बल ८१५ कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी मंजूर केली आहे, अशी माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

सध्याच्या प्राप्त परिस्थितीत भुरीकवठे येथील उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीपासून वागदरी, अकलकोट, अक्कलकोट स्टेशन, नागणसूर, तोळणूर आणि बोरोटी सीमेजवळच्या कर्नाटक हद्दीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ म्हणून गणला जातो. सध्या त्याची रुंदी काही ठिकाणी ३.७५ मीटर आणि सात मीटर एवढी आहे. परंतु वाढत्या वाहतुकीच्या रहदारीला सदर रस्ता हा अडथळा ठरत असल्याने त्या रस्त्याचे पेव्हड शोल्डर सह, मजबुतीकरणासह रुंदीकरण अपेक्षित होते. या कामासाठी एकूण ५१ किलोमीटरचा रस्ता होणार असून एकूण रकम ही ५८० कोटी एवढी मंजूर झालेले आहे.

त्याचप्रमाणे तिलाठी गेट, आचेगाव, वळसंग, धोत्री मुस्ती मार्गे हैदराबाद रस्त्याला जोडणाऱ्या तांदुळवाडी पर्यंत सध्याचा रस्ता दहा मीटर पर्यंत पेवर ब्लॉक सह रुंदीकरण भविष्यात करण्यात येणार असून त्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ हा आहे. या रस्त्याच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी सुमारे २०० कोटी रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. या रस्त्यांच्या पूर्ततेमुळे अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, वाढती रहदारी, सिमेंट कारखाने,
आणि कर्नाटक यातील दळणवळणाची सुविधा अधिक सुकर होणे या बाबी साध्य होणार आहेत.

याचबरोबर अक्कलकोट ते दुधनी या मार्गावर बोरी उमरगा गावाजवळ मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कुरनूर धरणातून सोडलेले पाणी गावाजवळील पुलावरून वाहून सतत वाहतूक बंद पडत असते याचा विचार करून या पुलाची उंची वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून सुमारे ३५ कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. हे तीनही काम मिळून अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील दळणवळणाची सुविधा अधिक व्यापक करण्यासाठी तब्बल ८१५ कोटी रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. यापूर्वीच अकलकोट ते तडवळ हा २७० कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झालेला आहे. येत्या नजीकच्या काळात या सर्व रस्त्यांच्या पूर्ततेने वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतुकीला पूरक आणि सक्षम असे मोठे रस्ते तयार होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. या सर्व कामांसाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी वारंवार पाठपुरावा केला होता त्याला यश आले आहे. या रस्त्यांमुळे अक्कलकोट तालुक्यातला शेतीमाल हा परराज्यात किंवा मराठवाड्यात विक्रीसाठी नेणे तसेच अक्कलकोटला चारही बाजू कडून येणाऱ्या स्वामी भक्तांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

या सर्व रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ८१५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटच्या नागरिकांना निवडणुकीच्या काळात दिलेल्या शब्दाला जागून आपली संपूर्ण शक्ती खर्च करून सदर रस्ते मंजूर करून आणलेले आहेत.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीला अनुकूल असे रस्ते निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्वामी भक्तांची होणारी गैरसोय देखील दूर होणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबींचा विचार करून माझ्या पाठपुराव्याला आणि मागणीला दात देत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून अक्कलकोटसाठी दिलेला शब्द लक्षात ठेवत सुमारे ८१५ कोटी रुपये एवढा निधी मंजूर केलेला आहे. तांत्रिक बाब आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या सर्व कामांना सुरुवात देखील केली जाणार आहे. या दोन्ही मंत्री महोदयांची अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे.असे आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR